महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या खेड तालुक्यातील प्रचारदौऱ्यातील गर्दी विरोधी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना धडकी भरवणारी...!
![महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या खेड तालुक्यातील प्रचारदौऱ्यातील गर्दी विरोधी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना धडकी भरवणारी...!](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_661f48a23f318.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर): शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा (दि.१६) तारखेचा खेड-आळंदी विधानासभेच्या पश्चिम पट्ट्यातील दौरा म्हणजे विरोध उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना धडकी भरवणारा ठरला आहे.
महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या काल खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दौऱ्यातील गर्दी बघता खेड तालुक्यात महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना मतदानात मोठी आघाडी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील पश्चिम पट्टा हा राजकीय दृष्ट्या सर्व निवडणुकामध्ये निर्णायक ठरत असतो. खेड तालुक्यातील विधानसभा निवडणुका असो किंवा सुरु असलेल्या लोकसभा निवडणुका कोणत्याही उमेदवाराला खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून मोठे मताधिक्य भेटले की त्या उमेदवाराचा विजय सुकर झाल्याचे चित्र आज पर्यंतच्या निवडणूकीतून दिसून आले आहे. त्यातच कालच्या प्रचार दौऱ्यातील अफाट गर्दी बघता आणि महायुतीचे सर्व प्रमुख नेते यांची एकजुटीची मोट बघता कुठे तरी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी धडकी भरवणारे वातावरण खेड तालुक्यात निर्माण झाल्याची चर्चा होत आहे.
सध्याचे विविध माध्यमांचे सर्व्हे बघता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे पारडे जड दाखवत आहेत. पण सध्याची ग्राउंडवरची परिस्थिती बघता डॉ. अमोल कोल्हे यांना खरंच पोषक वातावरण आहे का? याचेही सर्व्हे करणाऱ्या माध्यमानी अवलोकन करायला हवे. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षात काय विकासकामे केली आहेत. कोणते प्रश्न सोडवले आहेत हे सोडून डॉ. अमोल कोल्हे यांनी फक्त महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर टिकाटिपण्णी सोडून दुसरे काही मुद्देच मांडायचे नाहीत अशी भूमिका घेतली असल्यामुळे कुठे तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. याचाच मोठा झटका डॉ. अमोल कोल्हे यांना होऊ शकतो. त्यामुळे अशीच महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांची प्रचारात आघाडी वाढत गेली तर नक्कीच डॉ. अमोल कोल्हे यांना ही निवडणूक सोप्पी नसेल हे मात्र नक्की..
क्रमश: भाग -४