दिंडोरी शहरात उपजिल्हा रुग्णालयाची नितांत गरज...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी शहरातील ग्रामीण रुग्णालयास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन चौकशी केली.
तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे व शिवआरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विलास देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन, रुग्णांची आस्तेने चौकशी केली व सिक्युरिटी, कक्षसेवक, स्विपर यांच्या काही जागा खाली असून सोनोग्राफी मशीन तीन महिन्यांपासून आले असून सोनोलॉजिस्ट उपलब्ध नाही तसेच औषधांच्या उपलब्ध असलेल्या साठ्याबाबत माहिती जाणून घेतली सध्या वाढत असलेल्या सर्पदंश व श्वानदंश यासाठी लागणारे इंजेक्शन याचा उपलब्ध असलेल्या साठ्याबाबत माहिती घेतली तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून आली औषध साठा पुरेसा असून. दोन महिने पुरेल असा आहे. येथे रुग्णसेवे करता सदर जागा ही अपुरी पडत असून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत गरज आहे तसेच येथून पीडब्ल्यूडी कडे खिडक्या, ड्रेनेज लाईन, छताला क्रॅक या बांधकामा संदर्भात मागणी केलेली आहे. पण कारवाई झालेली नाही अशीही माहिती यावेळी मिळाली कोरोना काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत उत्तम कार्य करणाऱ्या डॉक्टर व नर्सेस व सर्व कर्मचारी यांचे पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.व यापुढे काही अडचणी असल्यास पक्षाचे पदाधिकारी कायम तत्पर राहतील असे आश्वासन दिले. सर्व उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.समीर काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चौरे मॅडम, डॉ.रायते, डॉ. देशमुख तसेच तालुका संघटक अरुण गायकवाड, नारायण राजगुरु, सुनील जाधव, संतोष मुरकुटे, अशोक निकम, संजय धात्रक आधी पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.