दिंडोरी विधानसभेची जागा भाजपाला सोडा.! दिंडोरी विधानसभा बैठकीत मागणी...
![दिंडोरी विधानसभेची जागा भाजपाला सोडा.! दिंडोरी विधानसभा बैठकीत मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66cd77819be99.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
भारतीय जनता पार्टीची दिंडोरी तालुक्याची महत्वपूर्ण बैठक आज सार्वजनिक वाचनालय येथे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभेत महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आणलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले.
काही कार्यकर्त्याची लोकसभेत महायुती म्हणून स्थानिक इतर महायुतीच्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यानॆ काम केले नाही याची खंत तालुका पदाधिकार्यांनाही मिटिंग मध्ये बोलून दाखवली या तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शेवटच्या घटकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत असून लोकसभेत तालुक्यात जे मतदान झाले ते फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर झाले. महायुती म्हणून आपले काही जोडीदार जबाबदरीने कार्यकत्यांना न्याय देत नसून येणाऱ्या विधानसभेत दिंडोरीची विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडवावी ही मागणी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.जेणेकरून भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होईल.महायुती सरकारने आणलेली लाडकी बहिन योजना, वीज बिल माफ,या योजनेचा फायदा जनतेला होत असून सामान्य जनतेपर्यंत या योजना पोहचवाव्या असे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केले.
महायुतीचीच्या सध्याच्या परिस्थितीवर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज असून लोकसभेत महायुतीला फटका बसला असून जागा सध्याच्या विधानसभा सदस्यावर जनता नाराज आहे त्याचा फटका लोकसभेत बसला त्यामुळे नवीन चेहरा विधानसभेला द्यावा ही देखील मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. परीस्थितीवर भाजपा कार्यकर्ते नाराज असून लोकसभेत महायुतीला फटका बसला असून जागा सध्याच्या विधानसभा सदस्यावर जनता नाराज असून त्याचा फटका लोकसभेत बसला असून नवीन चेहरा विधानसभेला द्यावा ही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
या बैठकीला उपाध्यक्ष योगेश तिडके,सरचिटणीस शरद कासार, रणजित देशमुख,आदित्य केळकर, नाना देशमुख,बाजार समिती संचालक शाम बोडके,मंडळ अध्यक्ष शाम मुरकुटे,किरण तिवारी डॉ.वराडे, महीला आघाडी मंगला शिंदे,नीता भामरे,मंदा गायकवाड,काका वडजे नगरसेवक नितीन गांगुर्डे, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया...
लोकसभेत महायुतीला तालुक्यात मोठा फटका बसला असून राज्यातील कामगिरीवर जनता खुश असून लाडकी बहीण योजना वीजबिल माफ या सरकारच्या निर्णयावर समाधानी आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीं महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महायुतीची विकासकामे महाविकास आघाडीच्या नेत्याकडून उदघाटन करत आहे.त्यामुळे नवीन चेहरा महायुतीने द्यावा असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून वरिष्ठ पातळीवर आपन पोहचवणार असून या मागणीसाठी जिल्हाअध्यक्षा मार्फत चर्चा करणारा आहोत.
योगेश तिडके - जिल्हाउपाध्यक्ष भाजपा नाशिक.