अजितदादा समोरच.! भाजप आमदाराने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या वाजवली कानशीलात...

अजितदादा समोरच.! भाजप आमदाराने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या वाजवली कानशीलात...

NEWS15 मराठी रिपोर्ट - आशिष ढगे

पुणे : पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजितपवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत घडली आहे.

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले.त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलेय.

अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली असलीतरी; दादांकडून मात्र यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नसून, हे प्रकरण घडलच नसल्याचं त्यांच्या कृतीतून जाणवून देण्याचा प्रयत्न केला.