धनराज महाले यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील : केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक (दिंडोरी) : धनराज महाले यांनी माझ्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली परंतु कोणतेही टीका टिप्पणी किंवा दोषाचे राजकारण त्यांनी केले नाही. माझ्या प्रत्येक कामगिरीला तसेच मला मिळालेल्या पदाला त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या.असे व्यक्तिमत्व फार कमी बघायला मिळतात त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील अशी इच्छा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व्यक्त केली.
दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार धनराज महाले यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दि. 4 जानेवारी रोजी दिंडोरी येथील अवनखेडखेड येथे सभागृहात पार पडला त्याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे,माजी आमदार अनिल कदम, लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील,ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, मविप्र संचालक प्रवीण जाधव, शेतकरी संघाचे चेअरमन बाळासाहेब जाधव,अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव,रंजना भानशी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनीही हजारोंच्या संख्येचा जनसमुदाय ही त्यांच्या कामाची पावती आहे जनतेच्या मनात धनराज महाले यांच्या विषयी असलेले प्रेम हे दिसून येत आहे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री धनराज महाले यांना सन्मानाची जागा देतील असे शब्द मुख्यमंत्र्यांच्यावतीने शब्द देतो असे प्रतिपादन करून विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दादा भुसे यांनी दिले.
यावेळी प्रवीण नाना जाधव यांनीही सध्याचे लोकप्रतिनिधी स्वतःचे कर्तव्य सोडून वैयक्तिक कार्यक्रमांना महत्त्व देत असल्याची खंत व्यक्त केली धनराज महाले यांच्या कार्य शैलीची ओळख करून देत विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटात येण्याची गळ घातली. यावेळी धनराज महाले समर्थकांनी महाले यांना विधान सभेत पाठवणारच असा चंग मनात बांधत वाढदिवस वाढदिवसानिमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार यांनी आपले मनोगत व्यक्त करून 2009 ते 2014 या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची आठवण करून दिली. याप्रसंगी दिंडोरी,पेठ येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते धनराज महाले मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.