राहुल गांधी यांच्या फोटोला "जोडेमारो" व "पुतळा_दहन" आंदोलन...

राहुल गांधी यांच्या फोटोला "जोडेमारो" व "पुतळा_दहन" आंदोलन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा. जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते राहुल गांधी हे त्यांचे चित्रिकरन करीत होते. 

या प्रकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली, त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार लातुर येथील छत्रपति शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोंच्या संखेने भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून शहर जिल्हाध्यक्ष देविदासजी काळे व ग्रामीण अध्यक्ष दिलीपराव (मालक) देशमुख यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो व पुतळा दहन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजप प्रदेश सदस्य रवि सुडे, विवेक बाजपाई, सुधीर धूतेकर निवडणूक प्रमूख गुरुनाथ मगे, सरचिटणीस प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, मीनाताई भोसले, दिग्विजय काथवठे, महिला मोर्चा अध्यक्ष रागिनीताई यादव, युवामोर्चा अध्यक्ष अँड. गणेश गोमचाळे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा हजारों च्या संख्येने उपस्थित होते.