सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत.! पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही - उद्धव ठाकरे
![सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत.! पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही - उद्धव ठाकरे](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_663317747f272.jpg)
कोल्हापूर - इचलकरंजी येथे महाविकास आघाडी लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य महासभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी; विरोधी उमेदवारासह भाजप व मोदी - शहांवर जोरदार निशाण साधला आहे.
या प्रसंगी ठाकरे म्हणाले की, सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत. महाराष्ट्राचा आकस महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला, मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होती. आताही सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत, पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच ठाकरे यांनी धैर्यशील माने यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की, धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी मी मते मागितली होती. यासाठी मी माफी मागतो. वाटलं नावाप्रमाणे असेल, पण धैर्य हरणारा माणूस पाहिला नाही. याने, तर डबल गद्दारी केली. गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार आहेत. मोदींनी महाराष्ट्राशी द्रोह केला, गद्दारी केली.
तर मोदी सरकार बदलत आहे. हे आता जगभर झालं असून, हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे. काल काय बोलले ते आज आठवत नाही, काय आश्वासन दिली ते कळत नाही. फुटबॉल सामन्यात होतं तसं मोदी दररोज सेल्फ गोल मारतात. मोदीजी गाय पे चर्चा करता, जरा महागाईवर पण बोला असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लवला.
तर सत्तेत आल्यानंतर शेती अवजारे यांच्यावरील जीएसटी माफ करणार असल्याचे त्यांनी म्हणटले आहे.
तर आपल्या वरिष्ठ नेत्यांवर टीका टिप्पणी केल्यास राज्यातील भाजप मंडळी शांत बसत नाही. तेही योग्य वेळीच पलटवार करताना नेहमी दिसतात.! त्यामुळे आता ह्या टीकेवर भाजप आणि पदाधीकारी काय प्रतिक्रिया देणार ह्या कडे लक्ष लागून आहे.