पालखेड बंधारा येथे हनुमान यात्रोत्सव निमित्त रथ मिरवणूक...

पालखेड बंधारा येथे हनुमान यात्रोत्सव निमित्त रथ मिरवणूक...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे सालाबाद प्रमाणे यंदाही हनुमान यात्राउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रा उत्सव निमित्ताने सायंकाळी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात रथाची सजावट करून रथावर विद्युत रोषणाई केली त्यानंतर ग्रामपंचायतचे कर्मचारी संदीप गायकवाड व सौ.छाया गायकवाड यांनी हनुमानाच्या प्रतिमेची व रथाची मनोभावे पूजा केली.तर सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

या मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर तरुणांनी नृत्य करून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. तर सुहासिनींनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून या रथाची मनोभावे पूजा केली यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रथ मिरवणुक यशस्वीतेसाठी दिलीप गायकवाड,गोविंद गायकवाड,काका गायकवाड,सुनील गायकवाड,विठोबा कक्राळे सिद्धार्थ वाघ आदींनी परिश्रम घेतले.