पाटणबोरी येथे शिवरत्न जीवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली...
![पाटणबोरी येथे शिवरत्न जीवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_65254932d7ee6.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या म्हणीतून; प्रखर राष्ट्रीयपणाचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक तसेच नाभिक समाजाचे 'शिवरत्न शूरवीर जिवाजी महाले' यांची ३८८ वी जयंती पाटणबोरी शहारात श्री संतोष नक्षणे यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण नाभिक बांधवांच्या उपस्थितित शुरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या वेळी महेंद्र नक्षणे, अक्षय नक्षणे, अमोल नक्षणे, नयन चौधरी,निलेश कडूकर ,संकेत कडूकर, अक्षय कडूकर, संतोष चौधरी, अजय नक्षणे, राजन्ना यालमपेलीवार, गोपी , श्रीकांत यालमपेलीवार, विनोद कडलवार , विक्की कडूकर सचिन करमलकर.