हरवलेले 88 मोबाईल शोधून नागरिकांना केले परत, गोंदिया पोलिसांची विशेष कामगिरी...
NEWS15 प्रतिनिधी - सुधीर शिवणकर
गोंदिया : सध्या मोबाईल ही अति गरजेची वस्तू झाली असून आता समाजातील प्रत्येकच कुटुंबात एक तरी मोबाईल असतोच. मोबाईल ही गरजेची वस्तू झाली असून, मोबाइल शिवाय आता कोणतेच काम होत नाही. अगदी घरचे बिल भरणे पासून तर खरेदी, बॅंकिंग अश्या सर्व कामे आता मोबाईल द्वारे केले जातात.
मागील 2021 ते 2023 पर्यंत गोंदिया शहर पोलीस स्टेशन मध्ये मोबाइल हरवल्याच्या अनेक तक्रारी होत्या; त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत.! शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, अरविंद राऊत, विजय गराड, शरद सैदाने, पुरुषोत्तम देशमुख आदींनी सायबरच्य माध्यमातून हरविले 88 महागडे मोबाइल शोधून मालकास परत केले. पोलिसांच्या या विशेष कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.