महामानव भरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने वधू वर महामेळावा - शाम गवारे
![महामानव भरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने वधू वर महामेळावा - शाम गवारे](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_660ec4c8a730e.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : कर्म. दादासाहेब गायकवाड वसतिगृह (जनता इंग्लिश स्कूल) दिंडोरी येथे दि.७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ ते ४ वा. बोद्ध वधुवर याचा मोफत वधुवर परिचय महामेळावा सामाजिक कार्यकर्ते श्याम गवारे यांनी आयोजित केला असून, ह्या वधुवर महामेळाव्यात बोद्ध जातीतील वधुवर उच्च शिक्षित, कमिशिक्षित, डॉक्टर, इंजिनिअर,वकील,शेतकरी, व्यापारी,मजुरी या सर्वासाठी असून हा महामेळावा प्रथम विवाह,पुनरविवाह, घटस्फोटीत,विधुर,अपंग, या सर्वांसाठी मोफत महामेळावा असून ज्यास्तीत ज्यास्त बोद्ध जातींचे वधू वर यांनी ह्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा.
ह्या महामेळाव्यात नववधू वर याचे ज्यास्तीत ज्यास्त लग्न जुळून सुख समाधानाने संसाराला लागावे हेच ध्येय असून त्यासाठी शाम गवारे यांनी हा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावासाठी त्वरित नावनोदणी करण्याचे आवाहन शाम गवारे यांनी केले आहे.