जल जीवन मिशन व घरकुल योजनांची चौकशी करण्याची मागणी
![जल जीवन मिशन व घरकुल योजनांची चौकशी करण्याची मागणी](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65ccd544b931a.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक
दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी जल जिवन मिशन व घरकुल योजनांचा बोजवारा उडाला असून तालुक्यातील निगडोळ,धागुर, पालखेड यासारख्या मोठ्या गावामध्ये अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे कामे चालू आहे याशिवाय रोजगार हमी योजनेचे देखील ग्रामसेवक काम करत नाही अशा समस्यांना तालुक्यातील जनता त्रासली असून या कामांची चौकशी करण्यात यावी म्हणून दि.१६ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करणार असून या कामांची माहिती घेऊन संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्यावतीने दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नामदेव गावित,भास्कर मालसाने,चंदर गायकवाड,संजय शिंगवी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्य आहेत.