लाईंनच्या लपंडावाणे जनता त्रस्त.! महावितरणचे दुर्लक्ष...

लाईंनच्या लपंडावाणे जनता त्रस्त.! महावितरणचे दुर्लक्ष...

  प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी - हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून स्वतंत्र असे पावरहाऊस आहे, मात्र कधीही लाईन जाणे व येणे लाईन जाण्याची वेळ, टाइम ठरललेली नसते, कधी, कधी पाच,पाच मिनिटाने जाणे, येणे असे त्रास देत असतें. दररोज नित्याने सकाळी कामाच्या वेळी व सायंकाळी जेवणाच्या मुर्तावर जाणे हा तर येथील विद्युत विभागाचा नियम झाला आहे.

या लाईनच्या लपंन डावाने येथील जनता हैराण झाली आहे. 

रात्रीला सुद्धा लाईन कधी येते व कधी पण जाते. रात्रीच्या वेळी अंधार पडल्याने सर्प, विंचू, व विषारी सर्पटणाऱ्या प्राण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशातच वारंवार लाईन जाण्याने जनतेला अंधाराचा सामना करावा लागत आहे. जनप्रतिनिधी गावाला वाऱ्यावर सोडले आहे.

जनतेच्या प्रश्नावर, जनतेच्या समस्यावर कधीही आवाज उठवतांना दिसत नाही. निवडणुका आल्या कि गावात वारे घालतात. नमस्कार, चमत्कार सुरु होते.मात्र जनतेच्या समस्या सोडविन्या साठी कधीच धावून जात नाही. येथील विद्युत विभागावर कोणाचीही वचक नाही. या मुळे येथील विद्युत विभागाचा मनमानी कारभार चालू आहे.येथील अभियंता हे पांढरकवडा येथे निवासी राहत असून उंटावरून शेळ्या खेदण्याचे काम सुरू असून एवढे मोठे गाव व परिसर लक्षात घेता पाटणबोरी येथे कॉटर्स व सर्व सुविधा असताना सुद्धा  मुख्यालयीन राहत नसल्याने येथील पावर हाऊसला वाऱ्यावर सोडले आहे.

काही दिवसांपूर्वी पिवरडोल येथील गावकऱ्यांनी अशाच लाईनच्या संदर्भामध्ये निवेदन दिले. व मा.आमदार संजय दरेकर साहेब यांनी फोन लावल्या मुळे गावात लाइन आली मात्र असे येथील जनतेला हे अभियंता अधिकारी जुमानत नसल्याने या अभियंता विषयी जनतेत नाराजी आहे.कधीकधी रात्री या परिसरातील गावांमध्ये लाईन नसल्याने गावातील सर्व जनता या लाईनच्या विरोधामध्ये आक्रोश होऊन पावर हाऊसला आपला मोर्चा घेऊन येतात .त्यावेळेस कोणीही वरिष्ठ अभियंता हजर राहत नसल्याने आपला  संताप्त व्यक्त करून जातात अशी व्यवस्था या पाटणबोरी येथील पावर हाऊस ची अवस्था असून येथील लाईन बंद पडल्यास लाईनमन सुद्धा आपले फोन बंद ठेवतात.

लाईन कधी येईल हे कोणाला विचारावे हा प्रश्न जनतेला पडते, पाटणबोरी येथील पॉवर हाऊस ची अशी अवस्था असून वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. वारंवार लाईनचा लपंडाव  होणे बंद करावा व यावर कायम स्वरूपी उपाय योजना करावी अशी येथील जनतेची मागणी होत आहे.