वडेगाव ग्रामपंचायतीचा पुढाकार - रस्त्यावर बांधलेल्या जनावरांविरोधात जनजागृती मोहीम.!
प्रतिनिधी - आकाश नंदागवळी, भंडारा
वडेगाव : साकोली तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सार्वजनिक रस्ते मोकळे व सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सरपंच-माधुरी ताई गहाणे, उपसरपंच ग्रामसेवक प्रशांत नंदागवळी, तसेच पूर्ण सदस्य गण व तंठा मुक्त अध्यक्ष व सर्व सदस्य सहभागी झाले होते.
गावातील गल्लोगल्ली फिरून रस्त्यावर बांधलेल्या गाई, गुरे व शेळ्या यामुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांबाबत नागरिकांना समज देण्यात आली. सरपंचांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांना रस्त्यावर जनावरे बांधू नयेत, अपघात टाळण्यासाठी व स्वच्छतेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्याबाबत जनजागृती वाढली आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.