लोहारकर यांचा पत्रकारांकडून सत्कार...
![लोहारकर यांचा पत्रकारांकडून सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e7f616a2834.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथे कार्यरत असलेले धान्य पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक तरुण तडफदार अक्षय लोहारकर यांची नुकतीच दिंडोरी तहसील येथे नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती झाल्याने; त्यांना तालुक्यातील जनतेने भरभरून शुभेच्छा दिल्या.
दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण व तालुका प्रतिनिधी संदीप गुंजाळ यांनी लोहारकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.