मोहाडी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन...
![मोहाडी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65f191804b7f0.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
मोहाडी येथील कर्मवीर एकनाथभाऊ जयराम जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोहाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.१६ ते १८ मार्च या कालावधीत सायंकाळी ६ वाजता कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव सभागृह मोहाडी येथे संपन्न होणार असल्याची माहिती आयोजनकांच्या वतीने देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती डी.बी.मोगल,चिटणीस दिलीप दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. दि.१७ रोजी सायंकाळी ७.३० वा. यावर्षीचा पुरस्कार श्रीकृष्ण दादा गांगुर्डे यांना सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सोमवार दि.१८ रोजी सिने अभिनेता क्रांतीनाना माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, गप्पागोष्टी रंजक खेळ,कॉमेडी तडका, दि.16 आणि 17 मार्च सायंकाळी सहा वाजता ज्युनिअर कॉलेज मोरे आयटीआय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अभिनव बालविकास मंदिर मोहाडी, किड्स मॅग्नस टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांचे स्वागत मविप्र संचालक प्रवीण जाधव करणार आंहे.संयोजक म्हणून प्राचार्य डॉ.विलास देशमुख, सरपंच आशा लहांगे,उपसरपंच भाग्यश्री जाधव,प्रा.कैलास कळमकर, उमेश जाधव,व्ही. जे.जाधव, रामराव जाधव,माया वारुंगसे,सुरेश सोमवंशी, रविंद्र जाधव,राजेंद्र परदेशी, बाळासाहेब अडसरे,सोनाली देशमुख, निलम घुले,प्रदिप जाधव,उत्तम जाधव आदींनी केले आहे. या कार्यक्रमास मविप्र संचालक अॅड.संदीप गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड,शिवाजी गडाख,डॉ. प्रसाद सोनवणे,नंदकुमार बनकर,विजय पगार,शोभा बोरस्ते, शालना सोनवणे,डॉ.संजय शिंदे, रविंद्र देवरे,अॅड.लक्ष्मण लांडगे,अमित बोरसे, अॅड.रमेशचंद्र बच्छाव, कृष्णाजी भगत,रमेश पिंगळे,चंद्रजीत शिंदे,जगन्नाथ निंबाळकर,मविप्र शिक्षणाधिकारी डॉ.अशोक पिंगळे, डॉ.डी.जी.जाधव,डॉ.भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव,प्रा.बी.डी.पाटील, डॉ.डी.डी.लोखंडे,डॉ.अजित मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.