किनगावच्या महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद.! पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापनावर विचारमंथन

किनगावच्या महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद.! पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापनावर विचारमंथन

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयात एकदिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन अर्थशास्त्र ,

समाजशास्त्र, भूगोल आणि लोकप्रशासन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर बुधवार दि १३ मार्च २०२४ रोजी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार असून, या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सकाळी १० वा उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे संचालक डॉ. पराग खडके यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, अध्यक्षस्थान श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव बोडके भूषविणार आहेत. यावेळी विचारमंचाला बीजभाषक श्रीलंकेच्या कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर एमटीएम माहेस  हे ऑनलाईन आभासी पद्धतीने संबोधीत करणार असून, विचारमंचावर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव बोडके, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर एक दिवशीय आतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रथम सत्रात विशेष अतिथी छतीसगड नवा रायपुर तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रोफेसर जगपाल सिंग बाल याचे मार्गदर्शन लाभणार असून, अध्यक्षस्थानी स्वा. रा. तीर्थ म. विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. एस. पी. घायाळ राहणार आहेत. त्यानंतर द्वितीय सत्रात संशोधन पेपर चे वाचन होणार असून, विषयतज्ज्ञ हिंगोलीच्या मॉडेल डिग्री कॉलेज चे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. नामदेवराव मुंढे हे संशोधन पेपरचे मूल्यमापन करून, हवामान बदलाचा प्रभाव आणि परिणाम यावर अनमोल मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अध्यक्षीय मनोगत स्वा. रा. तीर्थ म. विद्यापीठाचे लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. एम. आय. शेख व्यक्त करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ संपन्न होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबनराव बोडके तर  स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अप्पाराव काळगापूरे याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याएक दिवशी आंतरराष्ट्रीय परिषदेला देश विदेशातून प्राध्यापक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, या आंतरराष्ट्रीय परिषदेची महाविद्यालयात जय्यत तयारी झाली आहे; असे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव बोडके यांनी सांगितले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्राध्यापक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा भूगोल  विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल चव्हाण, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बळीराम पवार, लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. संजय जगताप, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बालाजी आचार्य, भूगोल विभागाच्या प्रा. डॉ. दर्शना कानवटे यांनी केले आहे.