राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी सर्व गुणसंपन्न व्हावं - प्रवीण जाधव

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी सर्व गुणसंपन्न व्हावं - प्रवीण जाधव

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना नेतृत्व वकृत्व या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतीलच घरापासून दूर राहून खऱ्या अर्थाने जीवनाचे धडे गिरवणार आहे, परंतु हे सगळे करीत असतांना विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिकावा. सर्वतोपरी ज्ञानाचा उपयोग करून समाज उपयोगी हिताची कामे करावी. जे काही कराल ते मनापासून करा आणि राष्ट्रीय सेवा योजनेतून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न व्हाव" असे प्रतिपादन मविप्रचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.  

दिंडोरी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक सुजित मुरकुटे, खतवड गावचे सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुखदेव खुर्दळ, पोलीस पाटील सोमनाथ मुळाणे, सोसायटीचे चेअरमन विजय मुळाणे, ग्रामपंचायत सदस्य सविता खुर्दळ, नामदेव गवे, शेतकरी संघाचे संचालक संतोष कथार, पत्रकार संदीप गुंजाळ, अमोल जाधव, सचिन खुर्दळ, संजय हिरे, राजेंद्र जाधव, रावसाहेब खुर्दळ, नंदू खुर्दळ, अमोल खुर्दळ, काका मुळाणे, रोहित मुळाणे, जालिंदर जाधव आदीसह प्रा.डॉ.के एन गायकवाड, उप. आर.आर झोमन  झोटिंग, कार्यक्रमाधिकारी डॉ.डी.के. लोंढे, श्रीमती पी.एस.कड, प्रा.शुभम वाघ महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रवीण नाना जाधव यांनी सांगितले की, आयुष्याचा ट्रेक एकदा चुकला की गाडी रुळावर येत नाही, म्हणून सर्वांनी यशाचा मार्ग अवलंबावा तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर कुठेही चमकाल, आजच्या या स्पर्धेच्या युगात नोकरीच्या मागे धावू नका नोकरी मिळवणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बना, उद्योजक बना ग्रामीण- शहरी ही दरी कमी करायची असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तितक्याच ताकदीने स्पर्धेत उतरा कारण गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले आणि आयुष्यात आपल्यामुळे आई-वडिलांचे मान कधी खाली जाणार नाही, मी व्यसनी होणार नाही अशी मनाशी खूणगाठ बांधा, रोज डायरी लिहा या समाजाच या देशाचा काहीतरी देणं लागतो ही भावना कायम मनात ठेवा. समाजासाठी जो काही करतो तोच या देशाचा खरा नागरिक होय .आणि इथूनच राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश सफल होईल असे मला वाटते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एन गायकवाड यांनी केले त्यातून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना प्रारंभ ते आधुनिक युगापर्यंतचा आढावा घेतला व श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना पोलीस पाटील सोमनाथ मुळाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत हिवाळी श्रमसंस्कार शिबिर तरुणांच्या आयुष्याला विविध पैलू पाडण्यासाठी उपयोगी होईल असे सांगितले. 

पत्रकार संतोष कथार यांनीही मार्गदर्शन केले.वि जि.प.शाळेचे शिक्षक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की युजलेस होण्याऐवजी युजफुल झालं पाहिजे.नाविन्यपूर्ण गोष्टी आपण या शिबिरातून शिकल्या पाहिजे, गावचे उपसरपंच सुखदेव खुर्दळ यांनी सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बलराम कांबळे यांनी केले तर आभार  डॉ.डी.के.लोंढे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रा.श्रीमती पी.एस. कड, प्रा.शुभम वाघ विद्यार्थी खतवड गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद जाधव,बाळू गवे,सारिका गवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.