शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - सचिन वडजे
![शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - सचिन वडजे](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c8985247a73.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे सर्वोतोपरी पाठपुरावा करू असे प्रतिपादन दिंडोरी शिक्षण संघाचे अध्यक्ष सचिन वडजे यांनी केले. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक सभा दिंडोरी येथे शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांचे निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी,एकस्तर वेतनश्रेणी, सेवा पुस्तक शिबिरे,प्रलंबित वैद्यकीय बिले,यासह अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी तालुका व जिल्हा शिक्षण विभागाकडे शिक्षक संघाच्या माध्यमातून पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर राज्य सदस्य प्रदीप मोरे,विभागीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद शिरसाठ,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष धनंजय आहेर,तालुका नेते धनंजय वानले आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष कै.अंबादास वाजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच दिंडोरी शिक्षक संघाचे कार्यालयीन चिटणीस कै. बाळासाहेब बर्डे सर यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दिंडोरी तालुका शिक्षक रत्न पुरस्कार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दिंडोरी येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.गुणवत्ता वाढीसाठी नौशाद यांचा ज्ञानसमृद्धी उपक्रम सर्व शाळांनी राबवावा तसेच दिंडोरी शिक्षक संघातर्फे या उपक्रमास पाठबळ देऊन तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले.
शिक्षण विस्तार अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल किरण शिंदे सर यांचा सत्कार करण्यात आला तसेच शंकरराव ठाकरे सर यांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेच्या पुढील ध्येयधोरणाविषयी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष किरण शिंदे,कोषाध्यक्ष मधुकर आहेर,नियाज शेख ज्येष्ठ सल्लागार शंकर ठाकरे संघटक नरेंद्र अहिरे,संपर्कप्रमुख प्रवीण वराडे,विलास जमदाडे,सुनील पेलमहाले विलास पेलमहाले,नौशाद गणेश बोरसे संदीप झुरडे,केंग वसंतराव येळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सचिन वडजे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष किरण शिंदे यांनी केले तर आभार सुनील पेलमहाले यांनी मानले.