पालखेड येथील पक्षी प्रेमींनी दिले कावळ्याला जीवदान...
![पालखेड येथील पक्षी प्रेमींनी दिले कावळ्याला जीवदान...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c8980cc437c.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज शुक्रवार २३ रोजी दुपारपासून एक कावळा उडत असताना विद्युत तारांमध्ये असलेल्या मांज्यामध्ये अटकला होता.
यावेळी अनेक कावळे त्याच्या सुटकेसाठी जमा होऊन काव काव करीत असताना गावातील तरुण पक्षीमित्र संदीप पीठे व सौरभ लिलके यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित एका उंच टोकराच्या साह्याने अथक प्रयत्न करून या कावळ्याला खाली घेऊन त्याचा पायामध्ये अटकलेला पतंग मांजा काढून जखमी झालेल्या कावळ्याला मलमपट्टी करून सोडून दिले.यावेळी जमलेले कावळे देखील आपल्या सहकारी मित्राची सुटका झाल्याचे पाहून काव काव बंद करून आकाशकडे भरकन उडून गेले. यावेळी पक्ष मित्र यांचे जमलेल्या नागरिकांनी आभार मानले.