चाकण.! 4 बांधिलकी जोपासत "आनंद वडेवाले" यांचाकडून पोलिसांच्या जेवणाची सोय...
News15 प्रतिनिधी : आशिष ढगे पाटील पुणे : सध्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महामारीने थैमान घातले असल्याने, सर्व देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. तर त्याच पार्श्वभूमीवर सर्व देशभर आणि राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलीस यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतांना. त्यांच्या जेवणाची पुरेसी सोय अजून देखील सरकारकडून करण्यात आली नाही किंव्हा अनेक ठिकाणी त्याचे नियोजन आखले नाही. याच घटनेची दखल घेत आणि आपली 4 बांधिलकी जाणून चाकण येथील आनंद वडेवाले उपमन्यू वाल्मिक तासकर यांनी सर्व कुटुंबासह पोलिसांच्या जेवणाची सोय केली आहे. समाजात वावरताना आपणही अशा प्रसंगी काही समाजाचे देणे लागतो या प्रेरणेने आज हे समाज उपयोगी काम केले अशी भावना आनंद वडेवाले यांनी व्यक्त केली. तर सर्वत्र जेवणाचे हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याने पोलिसांच्या जेवणाचे हाल होत असतांना चाकण येथील आनंद वडेवाले यांनी आमची सोय केल्या बद्दल आमी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया पोलिस बांधवांनी दिली.