मोठी बातमी : राजीनामा सोंग करणाऱ्या सारा सिटी डी फेजच्या कमिटीला सहाय्यक निबंधक यांची नोटीस, ठोस लेखी उत्तर न दिल्यास सखोल चौकशी होऊन प्रशासक राज येणार ?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेज सोसायटी मागील काही दिवसापासून कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत आली आहे. त्यातच सोसायटीचा कारभार पाहणाऱ्या कारभाऱ्यानी कारभारात केलेली अनियमिता झाल्याचा आरोप सर्वसामान्य सदनिका धारकांनी केला होता. यावर सोसायटी सभासद सोमनाथ काशिनाथ पाटोळे यांनी सहय्यक निबंधक खेड यांच्याकडे सोसायटीच्या कमिटी सदस्य यांच्या विरोधात लेखी स्वरुपाची तक्रार दाखल केली होती.
यावर काही अंशी सहाय्यक निबंधक यांनी सोसायटीच्या कारभाराच्या संदर्भात काही कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात अनियमितता असल्याचा त्यांना शंशय आल्याने त्यांनी तातडीने संपूर्ण सारा सिटी डी फेजच्या सर्व कमिटी सदस्य यांना तुमच्या सोसायटीवर प्रशासक का नेमू नये यासाठी आता नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये २५ पेक्षा जास्त मुद्द्यांचा उल्लेख करून त्या मुद्द्यांचा सखोल लेखी खुलासा करण्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे काही आम्ही कसे बरोबर आहोत यासाठी राजीनामा नाट्य करणारे कमिटी सदस्य नोटीस आल्याने तोंडावर पडले आहेत. तर काही कमिटी सदस्य हे पदावर आल्यापासून कमिटीची वकिली करून थकले आणि कुणी सर्वसामान्य सभासद काही विचारायला गेला तर त्याला पोलीस ठाण्याची धमकी द्यायचे असा नवीन पायंडा त्यांनी सोसायटीत घातला होता.
यातील काही कमिटी सदस्य हे प्रामाणिक असूनही त्यांनी जे कारभार करत होते त्यांच्या कारभाराच्या बद्दल कधी ब्र शब्दही न काढल्याने तेही या चौकशीत अडचणीत येऊ शकतात अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत बघता जो पर्यंत कमिटी सदस्य यांच्या बद्दल कुणी आवाज उठवत नव्हते तो पर्यंत सगळे डोळे झाकून कारभार बघत होते. पण जेव्हा पासून प्रामाणिक आणि आर्थिक भुर्दंडाला सभासद बळी पडले तेव्हा डोळे झाकून कारभार बघणारे जागे झाले आणि मी त्यातला नाही अशा अविर्भावात कोण राजीनामा देऊ लागले तर कोण काही तरी कुभाड रचून पोलीस ठाण्याची भीती दाखवून सोसायटी कारभारातून लांब पळायला लागले. यात सचिव यांनी तर जो सोसायटी ताळेबंद ३० सप्टेबर पर्यंत पूर्ण करून द्यायचा होता तो ताळेबंद चौकशीची चाहूल लागताच तातडीने ताळेबंद खाजगी लेखाधिकारी यांच्याकडून तयार करून घेतला. पण यातील मूळ मुद्दा हा आहे कि, जर तुमची सगळी बिले बरोबर होती तर तो ताळेबंद ३० सप्टेबर पर्यंत का तयार करून घेतला नाही. त्यावर वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन तो सर्व सभासद यांच्या समोर का ठेवला नाही हे एक ना अनेक प्रश्न सभासद उपस्थित करत आहेत.
मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या सारा सिटी डी फेजच्या कारभाऱ्यानी आता आमचे पैसे सोसायटी विकासकाकडे आहेत असे दाखवले आहे. आमच्या प्रतिनिधी यांनी सोसायटी विकासकाला संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी आमच्याकडून कोणताही सोसायटीच्या संदर्भातील बाकी राहिलेली नाही त्यासंदर्भातील सर्व बिले आमच्याकडे उपलब्ध आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हे कारभारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तर काही कारभारी सर्व सामान्य सभासद यांची मोठी फसवणूक करून पळ काढण्याच्या मागे होते त्यानाही नोटिशीमुळे चपराक बसणार आहे. तर काही कमिटी सदस्य हे कारभार स्वतः करत होते कि आपल्या पत्नींना कारभार करायला सांगत होते हाही मोठा प्रश्न सर्वसामान्य सभासद प्रश्न उपस्थित करत आहेत. पण चुकीचा कारभार करणाऱ्या कमिटी सदस्य यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निच्चीत करून त्यांच्याकडून सक्तीची वसुली करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सारा सिटी डी फेजचे सर्वसामान्य सभासद करत आहेत.