मोठी बातमी : चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनी प्रशासनाला त्रास द्याल तर खैर नाही, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
महाळुंगे इंगळे : चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनी प्रशासनाला कुणी त्रास दिला तर आता खैरे नाही असाच काहीसा इशारा आता महाळुंगे MIDC पोलीसांनी एका प्रकरणात ६ जणांवर गुन्हा दाखल करून दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, खरबवाडी गावच्या हद्दीतील एका नामांकित कंपनीत क्वालिटी मॅनेजरची कंपनीला लेबर पुरवणाऱ्या व्यक्तीने व कंपनीतील दोन सुपरवायझर यांच्यासह ३ कंपनीत लेबर म्हणून काम करत असलेल्या एकूण सहा जणांनी चार चाकी गाडी फोडून व फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी अंकुर दिवाकर कुलकर्णी(वय -४२ वर्षे), रा. मोशी हे खराबवाडी गावातील एका कंपनीत क्वालिटी मॅनेजर म्हणून काम पहात आहेत. त्यांनी लेबर पुरविनारा आरोपी हर्षद चौधरी याचे कामगार वेळेवर कामावर येत नसल्याची तक्रार एच. आर यांच्याकडे केल्याने आरोपी हर्षद चौधरी याला वाईट वाटल्याने त्याने फिर्यादीला घटनेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी शिवीगाळ करून तुला कंपनीत काम करून देणार नाही अशी धमकी दिली होती.
त्यानंतर दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी कंपनीतून त्यांच्या चारचाकीमधून घरी जात असताना कंपनी पासून १०० मिटर अंतरावर मोटरसायकल वरून आलेला आरोपी गौरव पटेल याने फिर्यादीची गाडी अडवून फिर्यादीला शिवीगाळ करून व हातातील लोखंडी रॉडणे गाडीच्या समोरील काचावर जोरात मारले. त्यानंतर कंपनीत काम करणारे आरोपी विकास सोनकर, संदेश सोनकर, अजय पटेल, रोहित पटेल हे फिर्यादीच्या गाडीकडे पळत आले. त्यांनी हातातील लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी फिर्यादीच्या गाडीच्या सर्व बाजूच्या काचा फोडून टाकल्या. त्यानंतर मुग्रूर आरोपीनी दहशद माजवीण्याच्या हेतूने फिर्यादिला शिवीगाळ करून विकास सोनकर या आरोपीने फिर्यादीला मारण्याच्या हेतूने बिअरची बाटली गाडीवर फेकून मारली.
आरोपी यांनी फिर्यादीला लोखंडी रॉडने उजव्या बाजूस मानेवरही मारले. त्यामुळे फिर्यादीला मुका मार लागला. यात आरोपी हर्षद चौधरी, गौरव पटेल, विकास सोनकर, संदेश सोनकर, अजय पटेल, रोहित पटेल यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १२६(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ३२४(५), ३५२, ३५१(३), ११० क्रिमिनल अँमॅन्टमेन्ट अँक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई हि महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, संतोष वायकर, मंगेश कदम, अमोल माटे, गणेश गायकवाड, शरद खैरे यांनी केली. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पोपट काळे हे करत आहेत.