मोठी बातमी : पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ची उत्कृष्ठ कामगिरी, गुन्हा घडल्यापासून ४ तासात आरोपी ताब्यात..!

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ची उत्कृष्ठ कामगिरी, गुन्हा घडल्यापासून ४ तासात आरोपी ताब्यात..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

महाळुंगे(इं) : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रोड दरम्यान विशाल गार्डन सोसायटी जवळ सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास समर्थ किराणा स्टोअर्स येथे एक महिलेला चॉकलेट व बडीशेप घेण्याच्या बहाण्याने घुलवून अनोळखी व्यक्तीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पेंडल व चैन खेचून आरोपी पसार झाला होता. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अवघ्या ४ तासात आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केल्याने गुन्हे शाखा पथकाच्या युनिट ३ चे परिसरातुन कौतुक होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, ३ जून २०२५ रोजी फिर्यादी सुमन काशिनाथ शिंदे(वय-६५ वर्षे) रा. चारभुजा सोसायटी, चक्रेश्वर रोड, चाकण, ता. खेड, जि- पुणे या महिलेला चॉकलेट व बडीशेप घेण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, पेंडॉल व चैन खेचून त्याच्या मोटरसायकल वरून तो चाकण दिशेला पसार झाला होता. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून चाकण पोलीस ठाण्यात येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तसेच सहकारी अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित गाडीच्या संदर्भातील २० किमी परिसरातील सिसिटीव्ही तपासून पोलीस हवालदार भोसुरे व पोलीस शिपाई सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यशवंत दिगंबर सूर्यवंशी(वय ३२ वर्षे) रा. सध्या बोरजाईनगर चाकण, ता.खेड, जि- पुणे यास बोरदरा गावचे हद्दीत संधार कंपनीजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४)प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केला. त्याच्या अंगझडतीत गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये १८००००/- व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पॅशन प्रो गाडी नंबर एम एच -१४ एच ई २४९३ ही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी हि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गुन्हे शाखा युनिट-३ पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस हवालदार आढारी,भोसुरे,पोलीस शिपाई सूर्यवंशी, बाळसराफ,दांगट, काळे यांनी केली आहे.