दरोडयाचे तयारी असणारी गैग महाळुंगे पोलिसांकडून शिताफिने जेरबंद, २ दरोडेखोरांसह ३ अल्पवयीन मुलांचा सहभाग, लाखोचा मुद्देमाल जप्त…!
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: औद्योगिक वसाहतीतील परिसरातील गुन्हयांना आळा बसविण्याकरीता गुन्हे घडत असलेल्या परिसराची माहिती व गुन्हयांचा वेळपरत्वे कालावधी यांचा अभ्यास करुन गुन्हयांचे क्राइम मैपिंग करण्याच्या सुचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याने पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शननुसार महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी महाळुंगे पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांना क्राइम मैपिंगनुसार पेट्रोलिंग करण्याचे सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना वराळे, ता. खेड, जि. पुणे गावच्या हद्दीतील कॉर्निंग कंपनीच्या जवळ काही मुले हत्यारानिशी सज्ज असून ते नजिकच्या अमेझॉन कंपनीवर दरोडा टाकुन माल लुटण्याच्या तयारीत असल्याची बातमी गोपनिय बातमीदार मार्फत मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाईचे सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदरचे दरोड्याचे तयारीमधील दरोडेखोर पळून जाणार नाहीत याची काळजी घेवुन नाकाबंदी करत दरोडयाचे तयारीत असणाऱ्या मुलांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांचेजवळ काही हत्यार मिळून आले. त्यांचे विरुध्द चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा रजि नंबर १२९४/२०२२ मा.वि. कलम ३९९, ४०२, आर्म अँक्त कलम ४, २५अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या झालेल्या कारवाईमध्ये १) सागर राहुल राठोड, वय २० वर्ष चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे २) महेश कान्हा राजपुत वय १९ वर्ष रा-गोडावुन चौक, भोसरी, पुणे ३) इतर ३ अल्पवयीन मुले यांना अटक केली आहे. वरील अटक आरोपी कडुन जप्त केलेले हत्यार एक लोखंडी कोयता, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी कटावनी, एक लोखंडी पाईप तसेच एकूण ३,४०,०००/रु किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकूण ३६ मोबाईल फोन.६०,०००/रु किंमतीचे २ मोटार सायकल असा एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींना दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी अटक करून तपास कामी त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन तपास करण्यात आला आहे. व त्यांच्याकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीविरुध्द उघडकीस आलेले गुन्हे -
१) गुन्हा रजि नंबर १२८८/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
२) गुन्हा रजि नंबर १२९३/२०२२ मा. द.वि. कलम ३९२, ३४ ३) गुन्हा रजि नंबर १३०३/२०२२ मा. द. वि. कलम ३९२ ३४
४) गुन्हा रजि नंबर १३०४ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४
वरील अटक आरोपी हे गुन्हा रजि नंबर १२९३/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४ मध्ये दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ- मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे, महाळुंगे पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक विलास गोसावी, दत्तात्रय जाधव, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, संतोष होळकर, अनिल महाजन, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, संतोष वायकर, राहुल मिसाळ, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे, पोलीस चालक संजय शिंदे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत.