BIG BREAKING : माणुसकीला काळीमा..!अल्पवयीन मुलीवर कन्हैयालालचा अत्याचार, लाज नसलेल्या कन्हय्यालाल थेट जेलात..!
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील येलवडी गावातील झोपडपट्टीत राहणार्या एका अनुसूचीत जातीच्या अल्पवयीन मुलीवर कन्हैयालाल बंजारा(वय-१९ वर्षे)सध्या रा. संत तुकाराम नगर झोपडपट्टी चाळीत येलवडी ता. खेड, जि.पुणे याने लैंगिक चाळे करून तिला मानसिक भैभीत केल्या प्रकरणी त्याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, एक अल्पवयीन मुलगी(दि.२८) रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राहात असलेल्या घरी एकटीच असताना त्यावेळी ती अल्पवयीन मुलगी घरा शेजारीच असणार्या पाण्याचा नळ चालू करण्यासाठी राहत असलेल्या खोलीच्या बाहेर पडली. त्यावेळी शेजारीच राहणारा आरोपी कन्हैयालाल त्याच्या खोलीत एकटाच असताना त्याने अल्पईन मुलगी नळाजवळ पाणी भरण्यासाठी जात असताना कन्हैयालाल याने पीडित मुलीचा हात धरून थेट त्यात खोलीत ओढले, त्याच्या खोलीत खेळण्याच्या गाड्या, विकण्यासाठीचे ब्लॅंकेट होते. यावेळी पीडित मुलीने कन्हैयालालचा हात झटकून त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी मोठ मोठयाने ओरडू लागली त्यावर आरोपीने पीडितेचे तोंड दाबून व खोलीची कडी लावून पीडितेला लादिवर झोपवले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी किळसवाणे कृत्य करण्यास सुरुवात केली.
आरोपी कन्हैयालाल याने पीडितेच्या अंगावरील कपडे काढून तो वाईट पद्धतीने तिच्या अंगावर विचित्र पद्धतीने हात फिरवू लागला. पीडित अल्पवयीन मुलीने जिवाच्या आकांताने आरडा ओरडा सुरू केला. त्यावेळी शेजारीच असणारे पीडित मुलीचे मामा व मामी तसेच काही शेजारील नातेवाईक आरोपीच्या खोली समोर जमा झाले. उपस्थित नातेवाईक यांनी पीडित अल्पवयीन मुलीला क्रूर कन्हैयालाल यांच्या तावडीतून सोडवून आरोपीच्या खोलीच्या बाहेर काढले. त्यानंतर पीडित मुलीच्या बरोबर झालेली आपबीती तीने तिच्या बहिणीला सांगून दोघींनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात येवून आरोपी कन्हैयालाल बंजारा यांच्या विरोधात भा.द.वि. कलम ३५४,३५४(ब), सह लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला, मुली यांच्या बद्दलच्या अत्याचाराच्या घटना यात वाढ होत आहे. वेळोवेळी अशा अपप्रवृतीच्या व्यक्तींना कडक शासन होण्यासाठी काही केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेऊन अशा नराधमाना कडक शिक्षा व्हायला हवी. त्याच बरोबर मुले एका विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांच्याशी पालकांनी संवाद ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. आपली मुले कुठे चुकीच्या मार्गवर तर जात नाहीत ना याचीही जबाबदारी पालकांनी निच्छित घ्यायला हवी. सध्याचे युग हे सोशल युग असल्याने सोशल माध्यमांचा होणारा अतिरिक्त वापर यावरही पालकांनी लक्ष ठेऊन मुलांना त्यापासून लांब ठेवायला हवे.
या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार हे करत आहेत.