दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा.! प्राथमिक शिक्षक संघाचे प्रांताधिकार्यांना निवेदन...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाने प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांची भेट घेऊन; लोकसभा निवडणूक कामकाजातून दिव्यांग शिक्षक, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच गंभीर आजाराने ग्रस्त कर्मचारी यांना वगळावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे, कार्याध्यक्ष किरण शिंदे, कोषाध्यक्ष मधुकर आहेर, संपर्कप्रमुख कल्याण कुडके यांनी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक कामकाजा संदर्भात चर्चा केली.
निवेदनातील मुद्द्यांवर बोलताना प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले की, दिव्यांग शिक्षक, गरोदर महिला, स्तनदा माता, गंभीर आजाराने त्रस्त कर्मचारी तसेच दीर्घ रजेवर असणारे कर्मचारी यांना निवडणूक कामकाजातून वगळण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. तसेच महिला कर्मचाऱ्यांना स्थानिक विधानसभा क्षेत्रातच त्यांच्या नियमित कामकाजाच्या ठिकाणालगत निवडणुकीचे कामकाज दिले जाईल असे त्यांनी सांगितले.