उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कांदा प्रश्नावर लवकरच मार्ग काढणार असे आश्वासन...
![उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कांदा प्रश्नावर लवकरच मार्ग काढणार असे आश्वासन...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6513bdcb7ed85.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यावर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल असा विश्वास देऊन, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कांदा प्रश्न मंत्रालयात आयोजित बैठकीतून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. गेल्या काही दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लिलाव बंद ठेवले असून, कांदा उत्पादकांना वेठीस धरले आहे. त्यांच्या मागण्यांवर केवळ बैठकांवर बैठका होत आहेत मात्र कोणताही तोडगा निघत नाही या मुद्द्यावरून मंत्र्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा देखील इशारा दिला आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द या बैठकीत दिला आहे.
यावेळी बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार तसेच नाफेडचे अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.