दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी; निवडणूक यंत्रणा सज्ज...

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी; निवडणूक यंत्रणा सज्ज...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे मतदान येत्या दि.२० मे रोजी होणार असून या लोकसभा अंतर्गत दिंडोरी - पेठ विधानसभेसाठी निवडणूकीच्या कामकाजासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

दिंडोरी -२० या लोकसभा मतदार संघाअंतर्गत दिंडोरी - पेठ विधानसभा संघात एकुण ३ लाख २१ हजार ५५८ लोकसंख्या आहेत. पुरुष १  लाख ६५  हजार ३७० तर महिला १ लाख ५६ हजार १९४ अशी लोकसंख्या आहेत. एकुण ३५७  मतदान केंद्रात मतदान होणार आहे. त्यासाठी १६०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ४०० शिपाई काजकाज पाहणार आहेत. १० टक्के कर्मचारी राखीव आहे.

संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे कामकाज करण्यासाठी ४४ क्षेत्रीय अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत.मतदान केंद्रावर वाहतुक करण्यासाठी ३७ बस,१०३ जीप वाहनाची उपलब्ध करण्यात आल्या आहे.नेमणूक केलेल्या कर्मचार्‍यांचे तृतीय प्रशिक्षण रविवार दि.१९ रोजी मविप्र महाविद्यालय उमराळे रोड येथे होणार असून त्याच ठिकाणाहुन अधिकार्‍यांना साहित्यांचे वितरण केले जाणार आहेत. त्यासाठी कर्मचार्‍यांना बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.मतदारांना मतदान करण्यासाठी येतांना १००  मीटर अंतरावर मोबाईल,हत्यार व ज्वलनशिल पदार्थ आणण्यास बंदी करण्यात आली आहे.तसेच सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावे, असे आवाहन  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे. 

महिलांसाठी केंद्र.!

दिंडोरी नाईक महाविद्यालय उमराळे रोड खोली क्र.२ मध्ये विशेष महिला केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलभानगर या ठिकाणी विशेष महिला केंद्र स्थापन करण्यात आल्या असून या केंद्रात केंद्राध्यक्ष ते शिपाई कर्मचारी पुर्णपणे महिला कामकाज पाहणार आहे. निवडणूक यशस्वीतेसाठी सहाययक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब शिंदे,दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे,पेठ तहसीलदार श्रीमती वैशाली गांगुर्डे आदींसह कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहे.