राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पाटणबोरी येथे पथसंंचालन...
![राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पाटणबोरी येथे पथसंंचालन...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_6539e4b8c886a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाटणबोरीच्यावतीने; विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता छात्रावास येथून संघाचे मैदानातून वाजत गाजत शिस्तबद्ध पद्धतीने पथसंंचालन दि. 25 ऑक्टोबर रोजी स्वयंसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
यावेळी अंदाजे 250 ते 300 स्वयंसेवकाचा यात सहभाग घेतला होता. जिजामाता छात्रवासाच्या प्रांगणातून स्वयंसेवक पथसंंचालन करत गावातील राम मंदिरापर्यंत गेले. या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वीरभद्रजी पाटील पाटण, तसेच प्रमुख वक्ते म्हणून नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधररावजी गाडगे यांचा सहभाग लाभला. यावेळी स्वयंसेवकांना अल्पोहाराची देखील व्यवस्था केली होती. तालुका संघ चालक सागर अलूरवार तसेच तालुका कार्यवाह निखिल शहाकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.