अभय साळुंके यांच्या हायवे परिक्रमा चा पानचिंचोली येथुन शुभारंभ...

अभय साळुंके यांच्या हायवे परिक्रमा चा पानचिंचोली येथुन शुभारंभ...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर

निलंगा तालुक्यातील पानचिंचोली ते औराद शहाजानी दरम्यान च्या हायवे परिक्रमेचा शुभारंभ दिनांक २८ जुन  रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पानचिंचोली येथुन करण्यात आला. 

लातूर जहिराबाद या निकृष्ट हायवे मुळे झालेले जवळपास दीडशे निष्पाप बळी व शेकडो कायमस्वरूपी अपंगत्व आलेले निष्पाप नागरिक युवक यांना स्मरून येणाऱ्या काळात होऊ शकणारे असंख्य अपघात टाळून जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी लातूर जहीराबाद हायवे तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे व दोषींवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी इतिहासातील पहिलीच हायवे परिक्रमा करण्यात येणार आहे.

यावेळी डॉक्टर सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, निलंगा काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, तालुका कार्याध्यक्ष नारायण सोमवंशी, निलंगा वकील मंडळाचे माजी अध्यक्ष अड तिरुपती शिंदे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.