सरांडी/बूज येथे समता सैनिक दलाचा ५ वा वर्धापन उत्साहात साजरा...
![सरांडी/बूज येथे समता सैनिक दलाचा ५ वा वर्धापन उत्साहात साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659a2fb563da3.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
लाखांदूर : सरांडी/बूज येथे काल दि. ६ जानेवारी रोजी समता सैनिक दलाचा 5 व्या वर्धापन दिनानिमित्त; धम्म प्रसार बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बुद्धवंदनेनं कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन महापुरुषांना वंदन करून रॅली काढण्यात आली.
बाबासाहेबांचे विचार जनसामान्यात पोहचावे यासाठी आपल्यातील सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांनी एक दल स्थापन केला. त्यालाच बाबासाहेबांनी समता सैनिक दल असे नाव दिले असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलं.
या कार्यक्रमाला अध्यक्ष गजेंद्र गजभिये राष्ट्रीय स्टॉप आफिसर, मार्गदर्शक आर. सी फुल्लुके तसेच समता सैनिक दलाचे सेवक उपस्थित होते.