औद्योगिक विकासासाठी भूसंपादन करण्यास मंजुरीसह निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल; खा. हेमंत पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प अंतर्गत; सात पूर्णा नदीवरील चार तसेच खरबी बंधाऱ्यांना वपिंपळगाव खुटा तलावासाठी मंजुरी, हिंगोली लोकसभा मतदार संघातील औद्योगिक विकासासाठी जुनुना व हदगांव भूसंपादन करण्यास मंजुरीसह निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्व संध्येला छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासकामा करिता; राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांनी प्राधान्य देऊन, विशेष पॅकेज जाहीर केल्याबद्दल त्यांचेमनापासून अभिनंदन.
यामध्ये ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प अंतर्गत सात, पूर्णा नदीवरील चार तसेच खरबी बंधाऱ्यांना व पिंपळगाव खुटा तलावासाठीमंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजी नगर येथे शनिवारी (दि.१६)मंत्री मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सर्वात प्रथम पोटा उच्च, जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि महमदापुरच्या उच्च पातळी बंधाऱ्यास मंजूर दिलीआहे. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाचशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतीसाठीवर्षभर पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यासोबतच किनवट तालुक्यातील महत्त्वाचे समजलेजाणारे उनकेश्वर उच्च पातळी बंधारा यास देखील २३० कोटी ६४ लक्ष रुपये मंजूरकरण्यात आला आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून आंध्र प्रदेश मध्येवाहून जाणारे पाणी इथेच थांबले पाहिजे. यासाठी गेल्या २४ वर्षापासून कळमनुरी, उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, महागाव, किनवट आणि माहूर या तालुक्यातील शेतकरीबांधवांकडून बंधाऱ्याची मागणी केली जात होती. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील या सातउच्च पातळी बंधाऱ्यास २४ वर्षानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यामुळेनांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये सातउच्च पातळी बंधाऱ्यासह कॅनलच्या दुरुस्त्या होणार आहेत. त्यामुळे शेवटच्याशेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथीलवीस कोटी रुपयांचा बंधारा, हिंगोली शहरासाठी आवश्यक असलेल्यापिंपळखुटा तलावासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योगा सोबतचनॅशनल हाय वे कडून १०० हेक्टरवर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क व हळदीचे क्लस्टर उभेकरणीसाठी जमिनीच्या भू संपादनास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. जुनुना परिसरात१०० हेक्टर म्हणजे २५० एकर जमिनीचे भू संपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे.हिंगोली शहरामध्ये उद्योग भवन नसल्यामुळे उद्योग भवनासाठी बारा कोटी रूपयांचीतरतूद करण्यात आली आहे. हदगाव येथील एम.आय.डी.सी भू संपादनासाठी दिडशे एकर जमीनखरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींनामूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी ६३ कोटी ३० लक्ष रुपयाला मान्यता देण्यात आलीआहे. त्याचबरोबर उद्योग विभागाकडून हदगाव व हिमायतनगर येथील बस स्थानकांचेसुशोभीकरण करण्यात येणार आहे. सोबतच सी.एमई.जी.पी.वाय. योजनेतून ६२० उद्योजक हिंगोली जिल्ह्यांमध्ये तयार करण्याचे उद्दिष्टठेवण्यात आले आहे.या सर्व मंजुरीमुळे हिंगोली लोकसभामतदारसंघातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली व सेनगाव तालुके नांदेडजिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव,हिमायतनगर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागावया सर्व तालुक्यांना या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. हिंगोलीलोकसभा मतदारसंघातील अतिरिक्त एक लाख एकर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. हिंगोलीलोकसभा मतदारसंघातील जलसंपदा, उद्योग, आरोग्य,ग्रामविकास, शिक्षण, परिवहनविकासासाठीच्या विषयांना विशेष प्राधान्य देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यानेखासदार हेमंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले.