श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय - निमशासकीय कार्यालयात साजरा करण्याची मागणी...

श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय - निमशासकीय कार्यालयात साजरा करण्याची मागणी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा,या मागणीसाठी श्री चक्रधर सेवा मंडळाच्यावतीने तहसिलदार मुकेश कांबळे यांना श्री चक्रधर स्वामी यांची प्रतिमा देवून निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, शासन परिपथक दि. २७ डिसेंबर २०२३ च्या परिशिष्टानुसार परिपत्रकातील परिच्छेद क्र.४ नुसार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन (श्री चक्रधर जयंती) भाद्रपद शुक्ल व्दितीया या तिथीनुसार गुरुवार दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाच्या जी आर प्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी,त्याचसोबत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा प्रत्येक कार्यालयात देऊन जयंती साजरी व्हावी,यासाठी श्री चक्रधर सेवा मंडळ दिंडोरी यांच्यावतीने प्रतिमा भेट दिली. शासनाचा जी आर व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा आलेख असणार्‍या लेखाची प्रत दिली आहे. शासनाने ठरविलेल्या तारखेप्रमाणे हा अवतार दिन अर्थत श्री चक्रधर जयंती दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी विनायक बोडके,निवृत्ती कथार,सुरेश कथार,गोपीनाथ ढाकणे,दौलत अरगडे गोविंद ढाकणे, शेखर घुगे,संतोष कथार,मनोहर कांगणे,प्रवीण कथार,तुकाराम चकोर,दगुनाना उगले,प्रल्हाद चकोर, अर्जुन ढाकणे,ज्ञानेश्वर ढाकणे,दौलत ढाकणे,दिपक ढाकणे,दत्तू घुगे  करंजसिंग राजपुरोहित,पंढरीनाथ अरगडे,अशोक निसाळ आदी उपस्थित होते.