मोहाडीत भागवत कथा उत्साहात...

मोहाडीत भागवत कथा उत्साहात...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील दगू गोवर्धने, जनाबाई गोवर्धने यांच्या स्मरणार्थ पुत्र दिनकर गोवर्धने नातू अनिल, देविदास व राजेंद्र गोवर्धने यांच्यातर्फे व येथील संत सावता महाराज मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने श्रावण मासानिमित्त संत सावता महाराज मंदिरात श्रीमद भागवत कथा सप्ताह उत्साहात संपन्न झाला.   

सप्ताहात भागवत कथाकार ह. भ.प.रजनीताई जाधव यांनी भागवत महात्म्य, व्यास -पांडव, श्री सुकदेव, परिक्षित चरित्र, ध्रुव -प्रल्हाद भक्तकथा, गजेंद्रमोक्ष व हिरण्य कश्यपू वध, समुद्रमंथन, श्रीराम चरित्र, कृष्ण जन्म, श्री गोवर्धनलीला, कंस वध, याशिवाय रविवारी दि.११ रोजी श्रीकृष्ण - रुक्मिणी विवाह, श्री सुदामदेव भेट, परिक्षित मोक्ष, व भागवत ग्रंथ वाचनाची फलश्रुती या विषयावर निरूपण केले. कथेला सिंथ वादक विशाल कोरडे तर तबल्याची साथ ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केली. राजेंद्र गोवर्धने यांनी सपत्नीक भागवत ग्रंथाची आरती करून प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. 

आज सोमवार १२ रोजी सकाळी ९ वा. ग्रंथाची टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. १० ते दुपारी १२ या वेळेत रजनीताई जाधव यांचे काल्याचे कीर्तन झाले.गोवर्धने बंधुंतर्फे साबुदाणा खिचडी व केळी महाप्रसाद वाटप करून या कथा सप्ताहाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी,माळीसमाज बांधव, श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळ व संत सावता महाराज भजनी मंडळ प्रयत्नशील होते.