जन्म - मृत्यू नोंदणी विभागातून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब; नागरिकांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना

जन्म - मृत्यू नोंदणी विभागातून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब; नागरिकांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर

लातूर शहर महानगरपालिकेच्या जन्म - मृत्यू नोंदणी विभागातून जन्म - मृत्यूचे प्रमाणपत्र दोन - तीन दिवसात मिळणे अपेक्षित असताना नोंदणी केल्यानंतर आठ - दहा दिवस उलटले तरी नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्रासाठी सध्या नागरिकांची विभागासमोर रांग लागत असून, प्रशासनाकडून त्यांना सॉफ्टवेअर हँग होत असल्यामुळे प्रमाणपत्राला विलंब होत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.