वरखेडा विद्यालयात मविप्र समाजदिन उत्साहात साजरा...
![वरखेडा विद्यालयात मविप्र समाजदिन उत्साहात साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c5e213e48b4.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
"मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था स्थापन करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे कर्मवीर रावसाहेब थोरात,गणपतदादा मोरे,आण्णासाहेब मुरकुटे डी.आर.भोसले,भाऊसाहेब हिरे,काकासाहेब वाघ,विठ्ठलराव हांडे,बाबुराव ठाकरे,डॉ.वसंत पवार अशा एक नाही अनेक कर्मवीरांनी संस्थेची स्थापना आणि विकासासाठी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी गितमंचाने समाज गीत गाऊन समाजदिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण दत्तात्रेय बापू वडजे व काशिनाथ उफाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय उपाडे यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेच्या हॉलचे उद्घाटन करण्यात आले. तर विद्यालयातील यश भुसाळ,तनिषा बलसाने,तेजस उफाडे, ऋतिका भोई या विद्यार्थ्यांनी भाषण केले. "म.वि.प्र.समाज संस्थेच्या कार्याची ज्योत पेटती ठेवून त्यांच्या ज्ञानाचा वारसा प्रत्येकाने जपला,पाहिजे.असे आपल्या मनोगतातून गायत्री पवार यांनी सांगितले.तर कर्मवीर हेच विकासाचे मुख्य स्रोत आहे,त्यांच्या अस्तित्वामुळे आज आपले अस्तित्व आहे,असे प्रमुख पाहुणे कवी महाडीक यांनी सांगितले.यावेळी नरेंद्र वड यांचा शालेय समितीच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्रकाश भुसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाज दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,पुष्पगुच्छ सजावट स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,१० वीतील स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी चा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन विठ्ठल ढिकले यांनी केले तर आभार निता सोनवणे यांनी मानले.