सौंदड वरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य.! नागरिक त्रस्त...

सौंदड वरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य.! नागरिक त्रस्त...

प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्गावर उडाणपुलाचे बांधकाम मागिल सात वर्षापासून सुरू आहे. सौंदड रेल्वे चौकीवरील उडाणपूल चार खांबावरील पिल्लर तयार असून, रेल्वेच्या विद्युत तारेमुळे वरील बांधकामासाठी रेल्वे विभाग मंजूरी देत नसल्याने सांगून सौंदड आणि फुटाळा परिसरातील महामार्गाची दोन्ही बाजूला असलेल्या रहिवासींयांना धुळीच्या साम्राज्यात वास्तव्य करावे लागते‌.

सदर काम करणाऱ्या कंपनीच्या ठिसाळ नियोजनामुळे बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काम करीत असल्याचे नागरीक व वाहनचालक बोलत आहेत.

वास्तविक महामार्गावर येत असलेल्या पूर्व दिशेला चुलबंद नदी फुटाळा-सौंदड तलाव पर्यंत उडाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, रेल्वे विभागाचे अडियल वागणूकीमुळे आणि खासदारांचे निष्काळजीपणामुळे परिसरातील वास्तव्य करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यावर ही वेळ आली आहे. दुसरीकडे सौंदड वासीय मात्र या उडाणपुल बांधकामाच्या धुळीमुळे त्रस्त असून, आजारी पडू लागले आहेत. धुळीमुळे श्वास गुदमरत आहे. ही गंभीर समस्या असून जिल्ह्यात दोन-दोन खासदार, पुढारी ए.सी.च्या गाडीत बसून मास्क लावून जात असतात. तेव्हा या पुढाऱ्यांना महामार्गावरील धूळ दिसत नाही का? पुढारी डोळ्याला पट्टी बांधून जातात का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून गोंदिया-बल्लारशाह लोहमार्ग असल्याने; रेल्वे चौकीवरील महामार्गाच्या वाहतूकीची कोंडी होत असते. या मार्गावरून रात्र-दिवस जड वाहनाची वाहतूक सुरू असते. याच लोहमार्गावर कोरोना काळात केंद्र शासनाने दोन वर्ष चालणाऱ्या पॅसेंचर गाड्या बंद केल्या होत्या. आज महामार्गावरील रेल्वे चौकीवरील बांधकामासाठी एक किंवा लागलेच तर दोन दिवसांसाठी लोहमार्गावर चालणाऱ्या रेल्वे गाड्या बंद का ठेवीत नाही. याकडे महामार्गाचे काम करवून घेणारे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधून काम मार्गी का लावत नाही. अशी सौंदड व फुटाळा वासीय व वाहतूक धारकांची मागणी आहे. महामार्गावरील उडाणपुलाचे बांधकामामुळे गावात धुळीचे साम्राज्य पसरविले असून, धूळीमुळे होणाऱ्या महामारीची लोकप्रतिनिधी वाट बघतात का? असे नागरीक व वाहतूक धारक बोलत आहेत.