राष्ट्रीय महामार्ग समस्या दूर करण्याची खासदार भास्कर भगरे यांची मागणी
![राष्ट्रीय महामार्ग समस्या दूर करण्याची खासदार भास्कर भगरे यांची मागणी](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e436c7be1f9.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्या तसेच खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी खासदार भास्कर भगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक बी.एस.साळुंखे यांचेकडे केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात खासदार भगरे यांनी साळुंखे यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
चांदवड टोल वर निफाड,दिंडोरी, देवळा तालुक्यातील वाहनधारकांना सवलत देण्याची कार्यवाही त्वरित करावी.मुंबई आग्रा महामार्ग वरील मंजूर उड्डाण पूल कामे सुरू करावे नाशिक पेठ महामार्ग वरील घाट रुंदीकरण मंजूर काम सुरू करावे, नाशिक दिंडोरी वणी कळवण राष्ट्रीय महामार्ग प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावा आदी विविध विषयांवर चर्चा झाली. प्रकल्प संचालक साळुंखे यांनी विविध प्रश्र्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.