दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने; मानवी साखळी करून स्वच्छता रॅली
![दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने; मानवी साखळी करून स्वच्छता रॅली](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66ed8c81a8a44.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियान या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत "स्वच्छ्ता ही सेवा अभियान", "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता दिंडोरी नगरपंचायत अंतर्गत दिंडोरी शहरात पालखेड रोड, नाशिक कळवण रोड, बाजार पटांगण येथे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा क्रमांक-१ व २ मधील मुख्याध्यापक नितीन बागुल यांच्या विशेष सहकार्याने स्वच्छता रॅली काढण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ येथे मानवी साखळी द्वारे जनजागृती कामी स्वच्छता ही सेवा नाव साकारण्यात आले. तसेच स्वछता शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी विजय देवरे ,स्वछता निरीक्षक महेंद्र कांदळकर ,शहर समन्वयक पुरुषोत्तम जाधव ,सचिन जाधव अशोक गांगुर्डे आदीसह न.प.कर्मचारी व जिल्हा परिषद शाळा क्रमांक- १ व २ मधील शिक्षक, विद्यार्थी उपस्थितीत होते.