लाडकी बहिणी योजनेमुळे टपाल कार्यालयात वाढू लागली गर्दी...
![लाडकी बहिणी योजनेमुळे टपाल कार्यालयात वाढू लागली गर्दी...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_668d40f965de5.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
राज्य सरकारकडून नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सुरू करण्यात आल्याने या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी महिलावर्गांची मोठी दमछाक होत असून आता गावागावात या योजनेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यातही गर्दी होत आहे.या योजनेमध्ये महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याने बँक खाते आवश्यक असल्याने दिंडोरी तालुक्यात गावागावात पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे.
तालुक्यात राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाकडून १५०० दिले जाणार आहे. या अंमलबजावणी १ जुलै २०२४ केली आहे. त्यानुसार २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि कुमारी व निराधार महिलांना पोस्ट कार्यालयातील बचत खातेही उघडले जात असून हे खाते उघडण्यासाठी व फॉर्म भरण्यासाठी पालखेड बंधारा येथे अनुष्का वर्मा व प्रज्ञा शार्दुल नागरिकांना मदत करीत आहे.