पिंपळगाव डेपोची एसटी अचानक गायब? विद्यार्थ्यांचे अतोनात हाल, बस सुरू करण्याची मागणी...

पिंपळगाव डेपोची एसटी अचानक गायब? विद्यार्थ्यांचे अतोनात हाल, बस सुरू करण्याची मागणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

पिंपळगाव बसवंत डेपोची बस गेल्या चार ते पाच दिवसापासून अचानक गायब झाल्याने, विद्यार्थी व प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे.

याबाबत वृत्त असे की, पिंपळगाव बसवंत डेपोची सकाळी सहा वाजेला झोपून मार्गे दिंडोरी नियमित येणारी बस अचानक बंद करण्यात आल्याने जोपुळ, लोखंडेवाडी, पालखेड कॉलनी, राजापूर,पालखेड, औद्योगिकवसाहत येथील विद्यार्थी व प्रवासी रोज या बसने प्रवास करत आहे. परंतु ही बस गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत नसल्याने, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा देखील सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी करायचे काय? याला जबाबदार कोण अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

याशिवाय या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एसटीचे पास देखील वाया जात असल्याने, या विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अनेक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने याचाही फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याबाबत आगार  प्रमुख गोसावी यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी संपर्क केला असता; आगार प्रमुखांनी ही बस गणपती उत्सवासाठी बाहेर पाठवण्यात आल्याचे कारण सांगितले. मात्र एका बाजूला उत्सव तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांची परीक्षा त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करून ही बस त्वरित सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी पालक प्रवासी वर्ग यांनी केली आहे.