लातूर शहरात भूगर्भातून मोठा आवाज? जमीन हादरल्याची चर्चा...

लातूर शहरात भूगर्भातून मोठा आवाज? जमीन हादरल्याची चर्चा...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूर शहरात आज (दि.30 ) रोजी दुपारी साधारणपणे 01:45 ते 2 च्या दरम्यान मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन, चौकशी करण्यात आली असता; भूकंपाची नोंद झाली नसल्याचे त्यांच्याकडून कळविण्यात आले.

मागील तीन तासाचा सिस्मोलॉजिकल डेटा तपासण्यात आला असल्याचे त्यांनी कळवले आहे.

त्यामुळे लातूर शहर व जिल्हावासियांना जिल्हा तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवाहन केले असून, आपण घाबरू जाऊ नये; तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगण्यात आले आहे