राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत चिंचखेड येथे विविध कार्यक्रम संपन्न...

राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत चिंचखेड येथे विविध कार्यक्रम संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सही पोषण देश रोशन; सुपोषित भारत - सशक्त भारत - साक्षर भारत या मध्यवर्ती संकल्पने अंतर्गत; राज्यात राष्ट्रीय पोषण महाअभियान उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सर्वप्रथम पूर्ण गावांमधून लहान मुलांना वेगवेगळी वेशभूषा करून ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये लहान मुलांची पोषण दिंडी काढण्यात आली. यावेळी जि. प. प्राथमिक शाळा तसेच चिंचखेड विद्यालयाचे विद्यार्थी यांनीही या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.

नाशिक बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर पगारे व दिंडोरी बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षिका सुशीला ढेरंगे यांच्या सहकार्याने चिंचखेड येथे पोषण आहार प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीनाक्षी गुंबाडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे शिवानंद संधान, सुशीला ढेरंगे, कुसुम पवार, माधव पवार पाटील श्रीमती डोखळे मोरे उपस्थित होते. चिंचखेड येथील पाच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहभागान अभियाना अंतर्गत जनजागृती करत विविध प्रकारच्या पालेभाज्या, डाळी, पाककृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अभियानाचे महत्त्व मीना पाटील, शारदा मेधने, मनीषा मोरे यांनी समजावून सांगितले. तसेच गरोदरपणात कोणकोणत्या पालेभाज्या डाळी व कुठले पदार्थ खाल्ले गेले पाहिजे हे सुनिता झेंडफळे व सुनिता सपकाळ यांनी सांगितले. यानिमित्त रांगोळी स्पर्धा आहार प्रदर्शन सुशीला ढेरगे यांनी पालकांना सामाजिक लेखापरीक्षण करून दाखविले प्राथमिक शाळेतील मुलींनी पोषण अभियान नाटिका व गीत सादर केले.

याप्रसंगी शिवानंद संधान यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले.  कार्यक्रम यशस्वीसाठी मदतनीस उषा कांबळे,जनाबाई गवळी,ललिता कावळे,सुनिता संधान,आरती धुळे  यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामस्थ माता पालक उपस्थित होते.