कळमनुरी.! प्रशासकीय इमारतीतील वॉटर फिल्टर धुळखात...
![कळमनुरी.! प्रशासकीय इमारतीतील वॉटर फिल्टर धुळखात...](https://news15marathi.com/uploads/images/202502/image_750x_67a4505519235.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
जिल्ह्याचा तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिण्यास डॉक्टरांकडून नागरिकांना मार्गदर्शक सुचना देण्यात येतात.! मात्र हिंगोलीतील कळमनुरी प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत थंड व शुध्द पाण्यासाठी लावण्यात आलेले आरओ वॉटर फिल्टर; अनेक वर्षांपासून धुळखात पडले आहे.
यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी प्रचंड हाल होत असल्याचे बोलले जात आहे. हे वॉटर फिल्टर तात्काळ चालु करावे अशी मागणी नागरिकाकडुन होत आहे.
दररोज नागरिक ग्रामीण भागातून कामासाठी येथे येतात; त्यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आरोवाटर फिल्टर बसविण्यात आले. मात्र हे फिल्टर अनेक वर्षापासून धुळखात व बंद अवस्थेत पडले असल्याने, याकडे तहसीलदार, सह उपविभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कर्मचाऱ्यांना विकत पाणी घेऊन पिण्याची वेळ येतीय.! थंड पाण्याचे तहान भागवणारा आरो वाटरफिल्टर तात्काळ चालु करावा अशी मागणी जोरधरत आहे.