पालखेड बंधारा येथे उद्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव.! विविध कार्यक्रमांचे आयोजन...

पालखेड बंधारा येथे उद्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव.! विविध कार्यक्रमांचे आयोजन...

 

दिंडोरी

          दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे उद्या सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ९ ते ११ प्रतिमापूजन,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत भव्य मिरवणूक कार्यक्रम होणार असून या जयंती उत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.भाऊ साठे जयंती उत्सव मंडळाने केले आहे.

न्यूज १५ मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक