उदगीर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ऑटोरिक्षा तपासणी मोहीम...
![उदगीर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ऑटोरिक्षा तपासणी मोहीम...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_6605b1d9d97f7.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, उदगीर
उदगीर शहरात नेहमीच बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. उदगीर शहरातील वाहतूकला शिस्त लागावी यासाठी आज गुरुवारी दि.२८/०३/२०२४ रोजी आरटीओ व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिम राबवुन, ऑटोरिक्षा'ची तपासणी केली.
या तपासणीमध्ये कागदपत्रे, फिटनेस, ऑटो चालक परवाना, ड्रेस कोड नसेल रजिस्ट्रेशन मार्गे अवैध प्रवासी वाहतूक, तपासणी करून दंड वसूल करण्यात आला अशी माहिती आरटीओ शितल गोसावी यांनी दिली आहे.