राजेंद्र गांगुर्डे यांचा दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार...
![राजेंद्र गांगुर्डे यांचा दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c031e895785.jpg)
N15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथील रहिवासी माजी केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे यांना सालाबादप्रमाणे गुरुवार दि. १५ ऑगस्ट रोजी दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने दिला जाणारा दिंडोरी भूषण पुरस्कार.! माजी आमदार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष सुनिता लहांगे, उपनगराध्यक्ष शैला उफाडे, नगरसेवक नितीन गांगुर्डे आदींच्या हस्ते देण्यात आला.
त्यानिमित्त दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने; सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, संदीप गुंजाळ, अशोक केंग, मनोज पाटील आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गांगुर्डे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.