राजीव विद्यालय व सुरीतेज उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण सप्ताह साजरा...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी -- येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या झरी तालुक्यातील मांडवी येथील राजीव माध्यमिक व सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी येथे शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. प्राचार्य संजय टोंगलवार सर यांच्या मार्गदर्शना खाली 22जुलै पासुन शिक्षण सप्ताह सुरू करण्यात आला. व 28 जुलै पर्यंत चालणाऱ्या या शिक्षण सप्ताहचे नोडल अधिकारी सौ. मिलन मुत्यालवार मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली जी. आर. बोळकुंटवार, के. एस.भेदोडकर, डी.जी.आगलावे यांनी या सप्ताहाच्या अनुषंगाने शाळेत विविध उपक्रम शिक्षण सप्ताह अंतर्गत राबवित येत आहे.
उच्च माध्यमिक विभागाचे नोडल अधिकारी सौ. सरिता अनिल बल्लाळ मॅडम यांच्या मार्गदरशनाखाली एन. एस. कोगुरवार सर हे विविध उपक्रम वर्ग 11वी व वर्ग 12 वी च्या विद्यार्थ्यांकडून राबवित आहेत. या कार्यक्रमा करीता शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी राकेश यनगंटीवार सर, गजानन नुगुरवार सर, मारोती गेडाम, एच.आर.कासावार, श्रीकांत तुंगलवार यांचे सहकार्य लाभले.