निळवंडीला दि.१० रोजी हनुमान यात्रोत्सव...
![निळवंडीला दि.१० रोजी हनुमान यात्रोत्सव...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_6614b682eeaa9.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बुधवार दि.१० रोजी हनुमान यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
निळवंडी येथील ग्रामस्थांचे हनुमान हे आराध्या दैवत आहे. वर्षभरात हनुमानाची विविध उपक्रम राबवून पुजाअर्चा केली जाते. यात्रेनिमित्त मारुती मंदिराभोवती विद्युत रोषणाई,पताका लावण्यात आल्या आहे. यात्रेमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने,खेळण्यांची दुकाने, मिठाई दुकाने,पाळणे आदी दुकाने थाटणार आहे. या निमित्ताने निळवंडी येथील युवक नाशिक रामकुंडावरुन कावडीव्दारे निळवंडी येथे पायपीट करुन तिर्थ घेऊन येतात. त्यांची गावाच्या वेशीपासून वाजत - गाजत मिरवणूक काढली जाते. मारुती मुर्तीला जलभिषेक व महापूजा, नवसपुर्ती केली जाते. रात्री कलावतांचा तमाशा, देवीचे गाणे जागरण, वाघ्या मुरलीचे गाणे व विविध देवतांची मिरवणूक आदी कार्यक्रम होणार असून यात्रेच्या
दुसर्या दिवशी हजेरी लावणे, लंगर तोडणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.